Subscribe:Posts Comments

You Are Here: Home » Marathi News, News » …तर दर सहा महिन्यांनी निवडणुका होतील : डॉ. मनमोहन सिंह

जेपीसीसह कोणत्याही समितीसामोर जाण्यास तयार |
मी घाबरलेलो नाही. मी लपवण्यासारखे काहीही कृत्य केलेले नाही. त्यामुळे जेपीसी (संयुक्त संसंदीय समिती) किंवा कोणत्याही चौकशी समितीसमोर हजर होण्यास मी तयार आहे.
मीडियामुळेच घोटाळे समोर आले
मी इथे देशातील मीडियाचे कौतुक करतो. त्यांच्यामुळेच घोटाळे सामोरे येत आहेत. या घोटाळ्यांची न्याय्य चौकशी होईल असे माझे आश्वासन आहे. पण मीडियाने वस्तुस्थिती आणि मतमतांतरे यामध्ये भेद ठेवावा. मतमतांतरांमध्ये त्यांनी खुशाल टीका करावी, परंतु वस्तुस्थिती मांडताना त्यात फेरफार करू नये.
माझ्याकडून काहीच चुका झाल्या नाहीत, असा माझा दावा नाही. पण तुम्ही जेवढा मला दोषी ठरवताय तेवढा दोषी मी नक्कीच नाही. जर अशा परिस्थितीत पंतप्रधानपद सोडण्याची मागणी होत असेल, तर दर सहा महिन्यांनी निवडणुका घ्याव्या लागतील… अशा शब्दात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply

© 2011 Indore news · Subscribe:PostsComments · Designed by Emaxglobal